इंडियाना
इंडियाना : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक राज्य. क्षेत्रफळ ९४,३५६; लोकसंख्या ५१,४३,४२२ (१९७०). ३७० ४७' उ. ४१० ४६' उ. आणि ८४० ४८' प. ते ८८० ४' प. याच्या दक्षिणेस ओहायओ नदी व केंटकी राज्य, पश्चिमेस इलिनॉय, उत्तरेस मिशगन सरोवराचा थोडाभाग व मिशिगन राज्य आणि पूर्वेस ओहायओ राज्य आहे.